बिहार निवडणूक; गुप्तेश्वर पांडेना टक्कर देण्यासाठी शिवसेनेचा मावळा सज्ज

Gupteshwar Pandey - CM Uddhav Thackeray

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Elections) पार्श्वभूमीवर घडामोडीला सुरुवात झाली आहे . शिवसेनेनंही (Shiv Sena) बिहारच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. बिहार विधानसभेच्या ५० जागा शिवसेना लढवणार असून, अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस (Mumbai Police) आणि महाराष्ट्र सरकारवर (Maharashtra Government) आरोप करणारे बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे (Gupteshwar Pandey) यांच्याविरोधातही शिवसेना उमेदवार देणार असल्याची माहिती आहे . शिवसेनेचे खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांनी दिली . त्यांनी ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत बिहार विधानसभा निवडणुकीसंदर्भात शिवसेनेची भूमिका मांडली.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी पदाचा राजीनामा देऊन जेडीयूमध्ये प्रवेश केला आहे. गुप्तेश्वर पांडेंविरोधात उमेदवार देणार असल्याचे देसाई म्हणाले .

डीजीपी पदावरचा माणूस कसा बोलत होता, त्याचा अभिनय कसा होता हे सर्वांनी पाहिलं होते . या पदावर राहून असं वक्तव्य करणं हे पांडेंना न शोभणारं होतं. पण आमचा मावळा त्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज आहे. पांडेंना महाराष्ट्राची ताकद कळेल, आम्ही त्यांच्यासमोर उमेदवार देत आहोत,असेही ते म्हणाले.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात विनाकारण महाराष्ट्र, मुंबई आणि शिवसेनेला बदनाम करण्यात आले . लोकांना कळते यामध्ये कोणाचा काहीही संबंध नव्हता. तरीही सूडबुद्धीचं राजकारण केलं गेलं. आम्ही आता बिहार निवडणूक लढवून याची परतफेड करणार आहोत. बिहार निवडणुकीत आम्ही ५० जागा लढवत आहोत. २०१५ ला शिवसेना बिहारमध्ये निवडणूक लढली होती, ज्यामध्ये दोन लाखांपेक्षा जास्त मतं शिवसेनेनं घेतली होती,” अशी माहिती अनिल देसाई यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER