बिहार विधानसभा निवडणूक निकाल: तेजस्वी यादवांची घोडदौड, तर नितीश कुमार पिछाडीवर

Tejashwi Yadav - Nitish Kumar.jpg

पाटणा : देशभरातील जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकांचा निकाल आज (१० नोव्हेंबर) जाहीर होणार आहे. बिहारमधील विधानसभा निवडणुकीचा (Bihar Assembly election) निकालाच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली आहे. बिहारमध्ये तीन टप्प्यांत निवडणुका पार पडल्या. यात २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबरला २४३ जागांसाठी मतदान झाले.

नुकताच हाती आलेल्या निकालानुसार महाआघाडीची घोडदौड सुरु असून, आतापर्यंत ५० जागांवर आघाडी घेतली आहे. तर एनडीए २२ जागांवर पुढे आहे. दरम्यान, बिहारमध्ये नेमकी कोणाची सत्ता येणार याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागून आहे. बिहार विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होण्यासाठी आता काही तासच उरले आहे. यामध्ये बिहारच्या जनतेचं भविष्य कोणाच्या हातामध्ये असणार याची प्रत्येकाला चिंता लागून आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER