१५ वर्ष वाटणे सोलत होतात का ? राबडीचा सुशील मोदींना टोमणा

Rabadevi on Sushil Modi.jpg

नवी दिल्ली : बिहार विधानसभेचा निवडणूक (Bihar Assembly Election) प्रचार आता वेगात आला आहे. भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी (Sushil Kumar Modi) त्यांच्या ‘संधी मिळाली तर’ या वाक्यप्रयोगाने फसले आहेत. कारकाट येथे प्रचार सभेत मोदी म्हणालेत, संधी मिळाली तर बेरोजगारी दूर करण्यासाठी जराही वेळ घालवणार नाही. यावर राबडीदेवी यांनी त्यांना टोमणा मारला – १५ वर्ष वाटणे सोलत होतात का ? सुमारे १५ वर्षांपासून बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जदयू आणि भाजपाची सत्ता आहे, हे उल्लेखनीय.

सुशील मोदी यांच्या या वक्तव्याच्या बातम्या छापून आल्या. सुशील मोदी यांनी त्यापैंकी एक बातमी ट्विटरवर शेअर केली. इथे राबडी देवी यांनी मोदींना कोंडीत पकडले. राबडी देवी यांनी मोदी यांचे ट्विट रिट्विट करत टोमणा मारला –

आता बोला!

मागील १५ वर्षांपासून वाटाणे सोलत होतात काय?, नीतीश कुमार आणि सुशील मोदी यांना १५ वर्षांनंतर बिहारमध्ये बेरोजगारी आहे हे समजले! आता तेजस्वी तुम्हा लोकांना मुद्द्यांवर आधारित राजकारण शिकवेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER