बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly election) तारखा निवडणूक आयोगाने घोषित केल्या. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर अशा तीन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात ७१, दुसऱ्या टप्प्यात ९४ आणि तिसऱ्या टप्प्यात ७८ जागांवर मतदान होईल. १० नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल.

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, बिहार विधानसभेची मुदत २९ नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे. एकूण २४३ जागांसाठी निवडणूक होणार असून यामधील ३८ जागा अनुसूचित जाती आणि दोन जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. निवडणुकीत १८ लाख ८७ हजार शेतकरी मतदार आहेत.

करोनाबाबत विशेष तयारी

करोनाच्या साथीच्या काळात निवडणूक होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीनेही सर्व काळजी घेण्यात आली आहे. सात लाख सॅनिटायजर्स, सहा लाख पीपीई किट, साडे सहा लाख फेस शिल्ड, २३ लाख हॅण्ड ग्लोव्ह्ज आणि ४७ लाख मास्कची व्यवस्था करण्यात आली, आहे, असे सुनील अरोरा यांनी सांगितले.

करोना रुग्णांसाठी मतदानाची सोय

विगोकर्णात असलेल्या करोना रुग्णांना शेवटच्या दिवशी संबंधित मतदान केंदावर जाऊन मतदान करता येणार आहे. हे मतदान आरोग्य अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली होईल. याशिवाय त्यांच्यासाठी पोस्टल सुविधाही उपलब्ध राहील.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER