‘महाराष्ट्रात बुडण्याआधी बिहारमध्ये प्रॅक्टिस करून घ्या’, भाजपचा शिवसेना-राष्ट्रवादीला टोला

Bihar Assembly Election-BJP criticize Shiv Sena-NCP .jpg

मुंबई : आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Assembly Election) युती करण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी बिहार निवडणूक एकत्र लढण्यासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि शरद पवार यांची बैठक झाली होती, त्यानंतर ही बैठक झाली. त्यामुळे या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे.

आणि यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) शिवसेना आणि राष्ट्रवादीला जोरदार टोला लगावला आहे. ‘बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र लढण्याचे संकेत… महाराष्ट्रात बुडण्याआधी बिहारमध्ये प्रॅक्टिस करून घ्या’ असा घणाघाती टोला भातखळकर यांनी लगावला आहे.

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येण्याचा अदयाप कुठलाही विचार झालेला नाही. त्याऐवजी शिवसेना बिहारमधील स्थानिक पक्षांशी युती करून निवडणूक लढवण्याला प्राधान्य देईल. बिहारचे अनेक स्थानिक पक्ष आमच्यासोबत निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. बिहारमधील नेते पप्पू यादव यांनी शिवसेनेसोबत काम करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. मी लवकरच पाटण्याला जाणार आहे. त्यावेळी यासंदर्भात चर्चा केली जाईल, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजच प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER