बिहार विधानसभा निकाल : एनडीएने गाठला बहुमताचा आकडा

Nitish Kumar

पाटणा : “आज तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आता परवा मतदान आहे आणि ही माझी शेवटची निवडणूक आहे. अंत भला तो सब भला. ” अशा शब्दांत राजकीय संन्यासाचे संकेत देणाऱ्या नीतीश कुमार (Nitish Kumar) यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly Election) निकालाचे कल आता हळूहळू स्पष्ट होत आहे. बिहारच्या निकालांमध्ये एनडीए आणि महाआघाडी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. बिहारमध्ये १२२ जागांचा बहुमताचा आकडा एनडीएने गाठला आहे. तर महाआघाडी १०५ जागांवर स्थिरावली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER