बिहार : काँग्रेसचे ११ आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

Congress

पाटणा :- नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्यातून काँग्रेस अजून सावरलेली नाही. आत्मचिंतनाच्या बैठका अजूनही सुरू आहेत. त्यातच काँग्रेसचे  १९ पैकी ११ आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. (Bihar Congress 11 out Of 19 MLAs preparing to Leave Party) बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेसने राज्यात संघटनात्मक बदल केले.

काँग्रेस सावरते आहे, अशी परिस्थिती निर्माण होत असतानाच ११ आमदार पक्ष सोडणार असल्याची माहिती काँग्रेसचे माजी आमदार भरत सिंह यांनी दिली. काँग्रेसचे राज्यसभा खासदार शक्तिसिंह गोहिल बिहारचे काँग्रेस प्रभारी होते. विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर मला या जबाबदारीतून मुक्त करा, अशी विनंती त्यांनी काँग्रेस हायकमांडला केली होती. त्यांची विनंती मान्य करत पक्षनेतृत्वाने त्यांना बिहार प्रभारी पदावरून मुक्त केलं. गोहिल यांच्या जागी माजी केंद्रीय मंत्री भक्त चरण दास यांना बिहारचे प्रभारी नेमण्यात आले. ‘त्या’ आमदारांनी तिकीट विकत घेतले होते

“काँग्रेसच्या १९ आमदारांपैकी ११ जणांनी पैसे देऊन काँग्रेसचे तिकीट घेतले होते” असा गौप्यस्फोट भरत सिंह यांनी केला आहे.

एनडीएमध्ये जाणार
राजद आणि भाजपा (NDA) आपलं संख्याबळ वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. NDA मधील अनेक नेते काँग्रेस आमदारांच्या संपर्कात आहेत, असा दावा भरत सिंहांनी केला आहे. त्यांचा हा दावा काँग्रेस नेते फेटाळत आहेत. काँग्रेस पक्ष एकसंध आणि एकजूट असल्याचे  काँग्रेसचे राज्यसभा खासदार अखिलेश सिंह यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षासाठी बिगर मराठा चेहऱ्याचा शोध ? 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER