इस्रायलमध्ये सर्वांत मोठा हल्ला; १०० पेक्षा जास्त रॉकेट्स उडाली; २० जणांचा मृत्यू

biggest attack in Israel

इस्रायल आणि फिलीस्तीनमध्ये दिवसेंदिवस तणाव वाढत चालला आहे. हमास गाझा येथून सोमवारी इस्रायलच्या दिशेने १०० पेक्षा जास्त रॉकेट्स उडाली आहेत. या रॉकेट्सच्या हल्ल्यांमध्ये तब्बल २० जणांचा मृत्यू झाला आहे. फिलीस्तीन आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, मृत्यू झालेल्या २० जणांमध्ये ९ लहान मुले आहेत. या हल्ल्यात ६५ हून अधिक लोक जखमी आहेत. इस्त्रायली लष्कराने ट्विट केले आहे की, या हल्ल्यात हमासच्या ३ कार्यकर्त्यांवर निशाणा साधून त्यांना ठार करण्यात आले. यावर हमासचे म्हणणे आहे की, हा हल्ला अनेक फिलिस्तीनी सशस्त्र संघटनेच्या इस्लामी लोकांनी केला आहे. हा हल्ला रात्रीच्यावेळी करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, फिलस्तीनी निदर्शक आणि इस्त्रायली पोलीस यांच्यात सोमवारी यरुशलम येथे हाणामारी झाली आणि यात १५३ लोक जखमी झाले. यावेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी सांगितले की, अल-अक्सा मशीद परिसराजवळ रस्त्यावर दगडफेक करण्यात आली होती. त्याचवेळी, फिलस्तीयांनी मशिदीच्या आवारात स्ट्रेन ग्रेनेड फायर केले आणि यात बरेच लोक जखमी झाले.

तातडीची बैठक

वाढत्या हिंसाचाराबद्दल संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने सोमवारी तातडीची बैठक घेतली. या बैठकीत प्रस्तावित विधानावर चर्चा करण्यात आली. ज्यात या प्रकरणात संयम ठेवण्याचे आणि या पवित्र स्थळांवरील ऐतिहासिक स्थितीचा आदर करण्याचे आव्हान देण्यात आले. या बैठकीत सुरक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, १५ सदस्यांनी हिंसाचार वाढण्याबद्दल चिंता व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button