बेघरांना शिवभोजन थाळीपेक्षा राष्ट्रवादीच्या जयंत थाळीचा मोठा ‘आधार’

NCP - Maharashtra Today

सांगली : लॉकडाऊनमुळे अनेकांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा बेघरांना राज्य सरकारकडून शिवभोजन थाळी मोफत देण्यात येत आहे. मात्र शिवभोजन थाळीचे केंद्र सीमित असल्याने अनेकांना त्यापासून वंचित राहावे लागत आहे. मात्र सांगलीमध्ये अशा बेघर असलेल्या भुकेलेल्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची ‘जयंत थाळी’ आधार ठरली आहे. महापालिका क्षेत्रासह आसपासच्या परिसरात मागील १५ दिवसांपासून भुकेलेल्यांसाठी जयंत थाळीच्या माध्यमातून मोफत जेवण पुरवण्याचे काम दिवसरात्र सुरू आहे.

सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसने हा उपक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील वाढती कोरोना स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडाऊन काळात गरजू आणि बेघरांच्या जेवणाचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊनमुळे सर्व काही बंद असल्याने रस्त्यावर कोणी फिरकत नाही. त्यामुळे बेघरांच्या जेवणाचे हाल असताना, त्यांच्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून माणुसकीचा हात देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नावाने दिली जाणारी ‘जयंत थाळी’ बेघरांसाठी आधार देणारी ठरत आहे. युवक शहर अध्यक्ष बल्लू ऊर्फ विनायक केरीपाळे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सर्व सहकारी गेल्या १५ दिवसांपासून जयंत थाळीच्या माध्यमातून मोफत जेवण देत आहेत.

सांगली, मिरज आणि आसपासच्या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मागील १५ दिवसांत सुमारे ७ हजार ५०० जयंत थाळी पॅकेट्सचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर सांगली, मिरज येथील शासकीय रुग्णालय, एसटी स्टँड, शहरातील कोविड सेंटर येथील रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना हे मोफत आणि पौष्टिक भोजन दिवसरात्र उपलब्ध करून देण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button