
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारला (Modi Government) वठणीवर आणण्यासाठी विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते सीताराम येचुरी (Sitaram Yechury) यांनी पुढाकार घेतला आहे. जानेवारीत ते यासाठी नव्याने प्रयत्न करणार आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) व काँग्रेस (Congress) नेतृत्वासह अन्य नेत्यांशीही ते यासंदर्भात बोलणार आहेत.
याबाबत माहिती देताना सीताराम येचुरी यांनी सांगितले की, माझ्या आग्रहाखातर शरद पवार मागच्या आठवड्यात चर्चेसाठी दिल्लीला आले होते. विरोधी पक्षांचे नेतृत्व शरद पवार यांंनी करावे, ही कल्पना तुमचीच होती का? असे विचारले असता येचुरी म्हणाले की, मूळ मुद्दा म्हणजे विरोधक मजबूत होणे गरजेचे झाले आहे. काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. काँग्रेसमध्ये काही उणिवा जरूर आहेत. तथापि, भारतीय राज्यघटना कमकुवत होऊ दिली जाणार नाही. शरद पवार मोठे नेते आहेत, त्यांचा अनुभवही मोलाचा आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे, हाच आजघडीचा मुद्दा आहे. असेही येचुरी म्हणाले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला