IND VS AUS: टीम इंडियाकडून स्टीव्ह स्मिथबद्दल मोठे विधान, खेळपट्टीवर छेडछाड प्रकरणात तोडले मौन

Steve Smith-Vikram Rathore

तिसर्‍या कसोटीत स्टीव्ह स्मिथने आपल्या शूजच्या सहाय्याने खेळपट्टीला नुकसान पोहचवले होते. या प्रकरणात विक्रम राठोड म्हणाले, ‘पंतला याची माहित नव्हती आणि त्यामुळे काही फरक पडत नाही.’

भारतीय संघाचा फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोडने सांगितले की तिसऱ्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतला हे माहित नव्हते की स्टीव्ह स्मिथने त्याचे गार्ड पुसले आहे. राठोड म्हणाला की, संघाला या प्रकरणाची माहिती नव्हती. माध्यमात यासंदर्भात बातमी आल्यानंतर टीमला या प्रकरणाची माहिती मिळाली.

राठोडने दिले विधान
राठोड म्हणाला, ‘आम्हाला या खटल्याची माहितीही नव्हती. सामन्यानंतर माध्यमात जेव्हा बातमी आली हे आम्हाला कळले. एक फलंदाज म्हणून पंतला याची माहित नव्हती. मला यावर भाष्य करण्याची इच्छा नाही कारण काही फरक पडत नाही.’

तो म्हणाला, ‘तो एक चांगला खेळाडू आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. आमचे गोलंदाज त्याच्याविरूद्ध आणि उर्वरित फलंदाजांविरुद्धच्या योजनेवर काम करत आहेत. शेवटच्या सामन्यात त्याने शतक झळकावले, पण आम्ही आमच्या रणनीतीवर टिकून राहू.’

स्मिथने खेळपट्टीवर केली होती छेडछाड
तिसऱ्या सामन्याच्या चौथ्या डावादरम्यान जेव्हा ड्रिंक्स ब्रेक झाले होते, तेव्हा ऋषभ पंत खेळपट्टी सोडून पाणी पिण्यासाठी गेला होता. या दरम्यान स्टीव्ह स्मिथने शूजच्या सहाय्याने खेळपट्टीचे नुकसान केले. ऑस्ट्रेलियन संघ विकेट मिळवण्यासाठी धडपडत असताना स्मिथने आपल्या गोलंदाजांना मदत करण्याच्या प्रयत्नात हे केले.

स्टीव्ह स्मिथची ही कृती स्टंपच्या कॅमेऱ्यात कैद झाली होती, परंतु ऑस्ट्रेलियन माध्यमांनी ती लपविण्याचा प्रयत्न केला आणि या दरम्यान टीव्हीवर जुने फुटेज दाखवायला सुरुवात झाली. असे असूनही स्मिथचा गुन्हा लपविला जाऊ शकला नाही, कारण ऑस्ट्रेलियाच्या बाहेर मिळणारा टेलिव्हिजन फीड मिळत होती ज्यात स्मिथने खेळपट्टीची हानी केल्याचे हे स्पष्टपणे दिसून आले. तथापि क्रीजवर परतलेल्या पंतने पुन्हा आपल्या बॅट ने खेळपट्टीचा भाग सपाट केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER