मराठा समाजाला मोठा धक्का, सर्वोच्च न्यायालयाकडून आरक्षण रद्द

Maratha reservation.jpg

नवी दिल्ली :- संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) निकाल आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय देत राज्य सरकारनं तयार केलेला मराठा आरक्षणाचा (Supreme Court) कायदा रद्द केला आहे. तसेच गायकवाड समितीच्या शिफारशीही नाकारण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे.

सर्वोच्च न्यायालयात बुधवारी यावर सुनावणी झाली. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. न्यायमूर्ती भूषण यांनी मराठा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आहेत अशी दुरुस्ती संपुष्टात आल्याचं सांगितलं. ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून दिलेले आरक्षण अवैध असल्याचं कोर्टाने सांगितलं.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगितीचा निर्णय दिला. निकाल हा निकाल आहे, पण मराठा समाजासाठी हे दुर्दैव आहे, असं मत छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केलं. माझा लढा गरीब मराठा घटकांसाठी होता. पण निकाल मान्य करावा लागतो. समाजाने संयम बाळगावा. साध्य कोरोनाचे संकट असून, प्रादुर्भाव वाढू नये याची काळजी घ्यायला हवी. आंदोलन, धरणे आंदोलन करु नये, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले.

तर न्यायालयानं दिलेला निकाल अत्यंत दुर्दैवी असल्याच मत भावना मराठा समाजाचे नेते विनोद पाटील यांनी व्यक्त केलं. या प्रकरणात न्यायालयात बाजू मांडत असताना राज्य सरकारकडून अनेक चुका झाल्या, असं पाटील म्हणाले. मुंबई उच्च न्यायालयात तत्कालीन फडणवीस (Fadnavis) सरकारने दिलेलं मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरी आरक्षण कायम ठेवलं होतं. मात्र याविरोधात काहींनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button