कल्याणमधील सापर्डे हत्या प्रकरणातील मोठा खुलासा; ‘या’ रागातून केली हत्या

Murder

मुंबई : कल्याणजवळील सापर्डे येथे हळदीच्या कार्यक्रमात व्यस्त असलेल्या महिलेची हत्या झाली होती. फक्त 4 तासांत पोलिसांनी या खुनाचा उलगडा करण्यात यश मिळवलं आहे. प्रेमसंबंध असलेली महिला दुसऱ्याकडे पाहते याचा राग मनात धरून आरोपीने तिचा खून केल्याचं स्पष्ट झालं आहे. रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास हळदी समारंभ सुरु असताना आरोपी पवन म्हात्रेने महिलेचा जीव घेतला. ही घटना घडताना आरोपीची आई सुद्धा तिकडेच उपस्थित होती.

हल्ला झाल्यानंतर आरोपीची आई त्या महिलेला वचवण्यासाठी धावली, मात्र तोपर्यंत महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेत पवनची आईसुद्धा जखमी झाली आहे. कल्याणचे डीसीपी विवेक पानसरे, एसीपी अनिल पोवार आणि सीनियर पीआय अशोक पवार या तिघांच्या मदतीनं पोलिसांनी या प्रकरणात कारवाई केली आहे. पोलिसांनी जवळपास तीन तास आरोपीची चौकशी केली.

कसून चौकशी झाल्यानंतर आपणच ही हत्या केल्याचं पवनने मान्य केलं आहे. डोक्यावर वार करून महिलेची हत्या केल्याची कबुली त्याने दिली आहे. पवन आणि मृत्यू झालेली शेजारची महिला यांचे प्रेमसंबंध जुळले होते, असं सुद्धा त्याने स्पष्ट केलं आहे. माझ्यावर प्रेम आणि दुसऱ्यांकडे बघते, या गोष्टीचा राग मनात धरून आरोपी पवनने महिलेची हत्या केली. दरम्यान, पोलिसांच्या तपासात पवनकडे एक पिस्तुलसुद्धा सापडले आहे. या सर्व प्रकाराचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER