कोल्हापुरात शस्त्र तस्करीचे मोठे रॅकेट उघड

Big racket of arms smuggling revealed in Kolhapur

कोल्हापूर : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कोल्हापूर येथील एका शस्त्र तस्करासह तिघांना अटक करून तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. टोळी कडून अत्याधुनिक पद्धतीचे सहा देशी पिस्तूल, अकरा काडतुसे हस्तगत करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान गणेश उत्सव काळात पोलीस दलाकडून संशयितांवर नजर ठेवली जात आहे. तसेच संशयित व्यक्तीची कसून तपासणी होत आहे. काल मंगळवारी या अशा प्रकारच्या तपासणीत दोन सराईत गुन्हेगारांकडे जिवंत काडतुसांसह पिस्तूल सापडली होती. याप्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ देशमुख यांनी तपासाची आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिस निरीक्षक तानाजी सावंत आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. मोठे शास्त्राचे रॅकेट उघड झाल्याची माहिती डॉ. देशमुख यांनी दिली.