रात्री मोठ्या राजकीय घडामोडी, महाराष्ट्रातील भाजप नेते दिल्लीत अमित शहांच्या भेटीला

Maharashtra Today

नवी दिल्ली :- सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या अटकेनंतर राज्यात मोठ्या घडामोडी घडून येत आहे. मुंबईत मोठ्या घडामोडी घडत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील भाजपच्या अनेक नेत्यांनी दिल्ली गाठून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली (BJP leader from Maharashtra meets Amit Shah in Delhi) आहे.

साखर उद्योगाच्या विविध समस्यांसंदर्भात नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांची एका शिष्टमंडळासोबत भेट घेतली, अशी माहिती ट्विट करुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. अमित शहांच्या भेटीला गेलेल्या शिष्टमंडळात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पंकजाताई मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, शिवेंद्रराजे भोसले, हर्षवर्धन पाटील, धनंजय महाडिक, पृथ्वीराजबाबा देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, राहुल कुल आदी नेत्यांचा समावेश होता.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणानंतर मुंबईत मोठ्या घडामोडी घडत असताना देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेणं यापाठीमागे आता राजकीय अर्थ लावले जात आहेत. तसंच या शिष्टमंडळाची भेट झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यात देखील काही मिनिटे चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मुंबईच्यात घडामोडींच्या अनुषंगाने शहा-फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याचा अंदाज लावण्यात येत आहे.

ही बातमी पण वाचा : जे आपण कमावलं नाही ते विकून खायचं हा कोणता धर्म?, शिवसेनेचा मोदींना टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER