शरद पवारांबद्दलची चर्चा काँग्रेसला संपवण्याचा मोठा कट ; काँग्रेस नेत्याचा आरोप

Sharad Pawar - Sanjay Nirupam

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना यूपीएचे (UPA) अध्यक्ष करण्याची चर्चा रंगली होती. लवकरच शरद पवार यूपीएच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारतील असा दावा केला जात आहे. मात्र या दरम्यान राज्यातील काँग्रेसच्या (Congress) ज्येष्ठ नेत्याने धक्कादायक आरोप केला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी काँग्रेसला संपवण्याचा मोठा कट सुरू   असल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर शरद पवार यांना यूपीए अध्यक्ष करण्याची चर्चा हा राहुल गांधींविरोधातील मोहिमेचा भाग असल्याचा गंभीर आरोप केला आहे. निरुपम यांनी ट्विट करत म्हटले की , दिल्लीपासून मुंबईपर्यंत राहुल गांधींविरोधात एक मोहीम  सुरू  असून शरद पवार यांना यूपीए अध्यक्ष करण्याची चर्चा हा त्याचाच एक भाग आहे.

याच मोहिमेअंतर्गत २३ स्वाक्षऱ्या असणारी चिठ्ठी लिहिण्यात आली होती. यानंतर राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) नेतृत्वात सुसंगततेची कमतरता शोधण्यात आली. काँग्रेसला संपवण्याचा एक मोठा कट आहे, असे निरुपम म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER