राष्ट्रवादीत मोठी इनकमिंग, नंदुरबारच्या युवा नेत्यासह बाजार समितीचे नेते राष्ट्रवादीत दाखल

Jayant Patil - Incoming In NCP

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) पुन्हा एकदा इनकमिंगला सुरुवात झाली आहे. आज नंदुरबार (Nandurbar) येथील युवा नेत्यासह बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार जिल्ह्याचे युवा नेते संदीप परदेशी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी संदीप परदेशी यांचे पक्षात स्वागत केले. संदीप परदेशी यांच्यासोबत स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भरत चौधरी, माजी नगरसेवक शेख आदिल दिलावर, गणेश पाडवी, योगेश मराठे, केसरसिंग क्षत्रिय, विकास क्षत्रिय, कमलेश पाडवी, धर्मराज पवार, नदिम बागवान, जयेश जोहरी यांनीही यावेळी पक्षप्रवेश केला. नंदुरबार जिल्ह्यात पक्षाच्या बळकटीकरणासाठी व पुढील राजकीय वाटचालीसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button