शिवसेनेला धक्का ; मोठा नेता भाजपमध्ये करणार प्रवेश

Balasaheb Sanap - BJP

मुंबई :- ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आता सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. नाशिकमध्ये सेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप (Balasaheb Sanap) हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा आहे. सानप यांच्या भाजप (BJP) प्रवेशामुळे सेनेला (Shiv Sena) मोठा धक्का बसण्याची चिन्ह आहे.

बाळासाहेब सानप यांनी दोनच वर्षात पुन्हा पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत मुंबईतील भाजप मुख्यालयात सानप भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहे, असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने प्रकाशित केली .

बाळासाहेब सानप यांची पक्ष बदलण्याची आता हॅटट्रिक साधणार आहे. गेल्या दोन वर्षात सानप यांनी 3 पक्ष बदलले आहे. आता पुन्हा एकदा ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. परंतु, दुसरीकडे सारख्या पक्ष बदलणाऱ्या नेत्याला भाजपमध्ये घेऊन काय फायदा होणार आहे, असा नाराजीचा सूर भाजपच्या कार्यकर्त्यांनी लगावला आहे. एवढंट नाहीतर सानप यांना पक्षात घेऊ नये म्हणून भाजपचा एक गट चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी करत आहे. पण आगामी नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये सानप यांचा फायदा होईल, असं सांगत सानप यांच्या भाजप प्रवेशाला वरिष्ठ नेत्यांनीच हिरवा कंदील दिला आहे.

ही बातमी पण वाचा : अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे? शिवसेनेचा भाजपला सवाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER