शेअर बाजारात मोठी पडझड; सूचकांक १११५ अंकांनी गडगडला

Sensex

मुंबई : शेअर बाजारात (Share Market) आज गुरुवारी मोठी पडझड झाली. सूचकांक १११५ अंकांनी ( 1115 points) घसरला.

यामुळे बाजारात काजीचे वातावरण आहे. बाजार बंद होताना सेन्सेक्स ३६ हजार ५५० अंकांवर होता. ही परिस्थिती मार्च महिन्यासारखी आहे असे अर्थ तज्ज्ञांचं मत आहे.

निफ्टीही घरंगळला

निफ्टीचीही घसरण झाली. ३५० अंकांच्या घसरणीनंतर १०८०० च्या अंकांवर आला. दिवसाच्या शेवटी १०८०५ अंकांवर होता. शेअर बाजारात विक्री मोठ्या प्रमाणावर वाढल्याने गुंतवणूकदारांचे ३ लाख ९२ हजार कोटींचे नुकसान झाले आहे.

बँकिंग, आयटी, ऑटोत घसरण

आज बीएसई इंडेक्सचे सगळे शेअर लाल निशाण्यावर होते. शेवटच्या तासात इंडसइंड बँकेचे शेअर ८ टक्क्यांनी घसरले. बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, टीसीएस, महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांचे शेअर्सही टॉप लूझर्समध्ये होते. टाटा स्टील, इन्फोसिस, अॅक्सिस बँक, मारुती,एअरटेल या कंपन्यांच्या शेअर्समध्येही घसरण झाली.

बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराच्या निर्देशांकात घसरण झाली होती. औषध कंपन्या आणि बँकांच्या समभागांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. अखेरच्या सत्रात शेअर बाजाराच्या निर्देशांकात ६६ अंकांची तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात २२ अंकांची घसरण होऊन बाजार अनुक्रमे ३७,६६८,४२ आणि ११,१३२ वर बंद झाला होता.

 

ही बातमी पण वाचा : सोने ४ दिवसात अडीच हजारांने झाले स्वस्त !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER