‘सिल्व्हर ओक’वर मोठ्या घडामोडी; उदयनराजे शरद पवारांच्या भेटीला

Sharad Pawar-Udyanraje Bhosale

मुंबई : अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी कालपासून बैठकांचे सत्र सुरू आहे. आजही सकाळी शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar), नवे गृहमंत्री दिलीप वळसे(Dilip Walse ) पाटील यांची बैठक झाली.

त्यानंतर भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले हे शरद पवार(Sharad Pawar) यांच्या भेटीसाठी मुंबईतील सिल्व्हर ओक येथे दाखल झाले. अनिल देशमुख यांच्यावर सीबीआय चौकशीचे संकट ओढावल्यानंतर सध्या राष्ट्रवादीच्या गोटात वेगवान हालचाली सुरू आहेत. त्यासाठी सिल्व्हर ओकवर(Silver Oak) बैठकी सुरू आहेत. अशातच उदयनराजे भोसले(Udayan Raje Bhosale) सिल्व्हल ओकवर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

मात्र, उदयनराजे भोसले या ठिकाणी शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आल्याचे स्पष्ट झाले. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्यावर लवकरच आणखी एक शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे सध्या शरद पवार सिल्व्हर ओकवर आराम करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button