मोठी घडामोड; काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात पवारांच्या भेटीला, चर्चेला उधाण

Balasaheb Thorat - Sharad Pawar

मुंबई : मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमध्ये (MVA)आलबेल असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस आणि शिवसेनेत कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावर मतभेद असल्याचे दिसून येत आहे. अशातच आज काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांची अचानक भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.

आज बाळासाहेब थोरात यांनी सिल्व्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीचे सरकार स्थापनेला जवळपास दीड वर्षांचा कालावधी झाला आहे. मात्र अजूनही महामंडळाचे वाटप झालेले नाही. त्यामुळे काँग्रेसकडून महामंडळाच्या वाटपाची मागणी जोर धरू लागली आहे. ज्या आमदारांना मंत्रिपद देण्यात आलेले नाही अश्याना किमान महामंडळाचे अध्यक्ष्यपद देण्यात यावे अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. आणिक याच मुद्द्यावरुन थोरातांनी पवारांची भेट घेतल्याची माहिती पुढे आली आहे. याशिवाय सद्यस्थितीत सुरू असलेल्या राजकीय घडामोडीवरही चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button