लसीकरण केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी मोठा निर्णय; आदित्य ठाकरेंची आयुक्तांशी चर्चा

Aaditya Thackeray - Iqbal Chahal - Maharashtra Today

मुंबई :- राज्यात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लॉकडाऊनचा (Lockdown) निर्णय घेतला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची वाढ सातत्याने होत आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहिमेवर राज्य सरकारने लक्ष केंद्रीत केले आहे. दरम्यान, राज्यात लसीचा तुटवडाही भासत आहे. मुंबईतील लसीकरण केंद्रांवरील गर्दी लक्षात घेता, लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्याबाबत महापालिका आयुक्त इक्बाल चहल (Iqbal Chahal) यांच्याशी चर्चा केली आहे. यावर लवकरच दिशानिर्देश जारी केले जातील, अशी माहिती आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

गोरेगावमधील नेस्को कोरोना केंद्र आणि बीकेसी केंद्रावर लसीकरणासाठी प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. याची महापौर किशोरी पेडणेकर यांनी दखल घेतली. नागरिकांनी केंद्रावर गर्दी करू नये. कोविन अ‍ॅपवर नोंदणी करणाऱ्यांनाच लस दिली जाईल. तसेच ज्यांचा पहिला डोस झालेला आहे, त्यांनाच प्राधान्याने डोस दिला जाईल, असे किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button