राज्य सरकारचा मोठा निर्णय : लस खरेदीसाठी आर्थिक तरतुदीचा आदेश जारी

CM Uddhav Thackeray - Coronavirus Vaccine

मुंबई :- कोविड-१९ महामारीच्या (COVID-19) वाढत्या प्रार्दुभावावर प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत राज्यातील जनतेचे लसीकरण (Coronavirus Vaccination) केंद्र शासनाच्या धोरणानुसार करण्यात येत आहे. त्यानुसार १ मेपासून १८ ते ४४ या वयोगटातील जवळपास ५.७१ कोटी लाभार्थ्यांचे कोविड-१९ लसीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या लसीकरणासाठी प्रतिव्यक्ती दोन मात्रा याप्रमाणे साधारणत: १२ कोटी लस मात्रेची आवश्यकता भासणार असून, केंद्राच्या सूचनेनुसार लस निर्मात्या कंपन्यांकडून लस खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने मोठी आर्थिक तरतूद केली आहे.

सीरम इन्स्टिट्यूटकडून (Serum Institute) तीन  लाख डोससाठी ९ कोटी ४५  लाख तसेच भारत बायोटेक इंटरनॅशनलकडून ४ लाख ७९ हजार १५० कोवॅक्सिन  लसींसाठी २० कोटी १२ लाख ४३ हजार रुपये या दराने विकत घेण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. लसींचा पुरवठा झाल्याप्रमाणे सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात मंजूर व वितरित अनुदानाच्या मर्यादेत देयक अदा केले जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button