केंद्राचा मोठा निर्णय, रेमडीसीवीरवरील आयात शुल्क माफ

remdesivir injection - Maharastra Today
remdesivir injection - Maharastra Today

नवी दिल्ली :- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना केंद्र सरकारने (Central Government) रेमडीसीवीरबाबत मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राने अँटी-व्हायरल औषध रेमडेसिव्हिरवरील आयात शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कोरोना रूग्णांवर (Corona Patient) उपचार करण्यासाठी रेमडीसीवीर वापरला जातो. मंगळवारी उशिरा जारी केलेल्या अधिसूचनेत, औषध तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या ड्रग पॅराफेरानियाच्या आयातीवरील शुल्क हटविण्यात आले. यामुळे भारतात रेमडीसीवीरच्या उत्पादनात वाढ होईल.

याबाबत रसायन मंत्री सदानंद गौडा (Sadananda Gowda) यांनी बुधवारी सांगितले की, रेमडीसीवीर अँटीव्हायरल औषधावरील सीमाशुल्क माफ करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे या औषधाचा पुरवठा वाढण्यास मदत होईल. देशात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता केंद्र सरकारने मंगळवारी रेमाडेसवीर, त्याला लागणारा कच्चा माल आणि व्हायरल अँटी-व्हायरल ड्रग्ज बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या इतर वस्तूवरील सीमा शुल्क रद्द करण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे रेमडीसीवीर इंजेक्शनचा घरगुती पुरवठा वाढण्यास आणि खर्च कमी होण्यास मदत होईल, असे ट्विट गौडा यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button