‘ठाकरे’ सरकारचा मोठा निर्णय, आता शिवभोजन थाळी पार्सलही मिळणार

Shiv Bhojan Thali - Maharashtra Today

मुंबई :- राज्यात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. अनेक ठिकाणी लोकांची गर्दी होताना दिसत आहे. त्यामुळे ही गर्दी रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावलं उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता राज्यभरात शिवभोजन थाळी (Shiv Bhojan Thali) पार्सल स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. शिवभोजन थाळी केंद्रावर गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

‘ब्रेक दि चेनच्या‘ अंतर्गत राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राज्यात शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात जनतेला उपलब्ध करून देण्याचे आदेश आज दिले. कोरोना काळात मजुर, कामगार, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला शिवभोजन थाळी मोठा आधार देत आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे सर्व हॉटेल, रेस्टॅारंट यांना पार्सल सुविधाच देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता शिवभोजन केंद्रावर देखील शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात उपलब्ध होणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.

सरकारने लागू केलेल्या सर्व नियमांचे पालन जनतेने करावे आणि प्रशासनाला मदत करावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या पार्सल सुविधेच्या निर्णयामुळे शिवभोजन थाळीच्या किंमतीमध्ये कोणताही बदल आपण केला नाही. त्याचबरोबर पूर्वीप्रमाणेच ५ रूपयात शिवभोजन थाळी सर्व सामान्य जनतेला उपलब्ध होणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button