‘रेमडेसिवीर’बाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय!

PM Modi-Remdesivir Injection

मुंबई :- काही दिवसांपासून रेमडेसिवीर इंजेक्शन (Remdesivir Injection) बरेच चर्चेत आहे. कोरोनाबाधितांवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या या औषधाचा तुटवडा जाणवत आहे, हे औषध जास्त किमतीत विकले जात आहे. या औषधाचा काळाबाजार केला जात आहे. दरम्यान, याच औषधाबाबत मोदी सरकारने (Modi Government) एक निर्णय घेतला आहे.

रेमडेसिवीर औषधाचे उत्पादन आणि पुरवठा वाढवण्याचा तसेच त्याच्या किमती कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मंत्री मनसुख मांडवीय यांनी रेमडेसिवीर औषधाचे सर्व उत्पादक आणि इतर हितधारकांसोबत बैठक घेतली. या बैठकीत रेमडेसिवीर उपलब्धतेच्या समस्येचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात आला.

रेमडेसिवीरच्या सात  उत्पादकांची सध्याची स्थापित क्षमता दरमहा ३८.८० लाख कुपी इतकी आहे. सहा उत्पादकांना दरमहा १० लाख कुपी उत्पादन क्षमता असणार्‍या सात अतिरिक्त जागांसाठी जलदगतीने मंजुरी देण्यात आली आहे. दरमहिन्याला आणखी ३० लाख कुप्यांचे  उत्पादन लवकरच सुरू होईल. यामुळे महिन्याला सुमारे ७८ लाख कुप्यांपर्यंत उत्पादन क्षमता वाढीस लागेल.

अतिरिक्त उपाय म्हणून डीजीएफटीने देशांतर्गत बाजारपेठेत रेमडेसिवीरचा पुरवठा वाढविण्यासाठी ११ एप्रिल रोजी रेमडेसिवीर इंजेक्शन तयार करण्यासाठी आवश्यक घटकांच्या (API) निर्यातीवर बंदी घातली आहे. सरकारी हस्तक्षेपानंतर, निर्यातीसाठी राखीव ठेवलेल्या अंदाजे चार  लाख रेमडेसिवीर कुप्यांचा  पुरवठा देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादकांकडून वळविला जात आहे. ईओयू/सेझ युनिट्सदेखील देशांतर्गत बाजारपेठेत पुरवठा करण्यासाठी सक्षम केली जात आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कोविडशी लढण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा दर्शविण्यासाठी, रेमडेसिवीर इंजेक्शन उत्पादकांनी स्वेच्छेने ते कमी करून ३ हजार ५०० रुपयांपेक्षा कमी केले आहे. रेमडेसिवीरच्या उत्पादनांना रुग्णालय / संस्था पातळीवरील पुरवठ्यास प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button