भारत सरकारचा मोठा निर्णय, इलेक्ट्रीक कार्समुळं विकासाला मिळणार मोठी चालना!

Electric Cars

जर्मनीच्या राइन नदीच्या काठावर बसलेलं मात्र दहा लाख लोकसंख्येचं शहर ‘कोलोन’ जर्मनितलं चौथं मोठं शहर आहे. या शहराची विशेषता अशी आहे की या शहरात आजही शेकडो वर्षापूर्वाच्या बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या पहायला मिळतात. जर्मनित पेट्रोल आणि डेझलवर चालणाऱ्या कार सोबतच बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या देखील विपूल प्रमाणात आढळतात.

या शहरात बॅटरीवर चालणारी पहिली कार १८९८ मध्ये पहिल्यांदा रस्त्यावर धावली. जर्मनीची ही पहिली इलेक्ट्रिक स्मार्ट कार होती. १९०४मध्ये अशा कार्सची संख्या वाढली. एका चार्जमध्ये या गाड्या १०० किलोमीटरचं अंतर पार करत असत. वेळेसोबतच बॅटरीवर चालणारी इतर वाहनं विकसीत झाली. बॅट्रीवर चालून आग विझवणारं पहिलं वाहन तेव्हा बनलं. तेव्हा त्या गाडीचा ताशी वेग होता ३५ किलोमीटर प्रतितास. होता दिवसेंदिवस इंधनाचे वाढते दर आणि प्रदुषण पाहता भारतात इलेक्ट्रीक कारचा बोलबाला वाढू शकतो. टेस्लानं स्मार्ट कार बाजारात आणल्यानंतर या चर्चेला उधाण आलंय. त्यातच दिल्ली सरकारनं सर्व सराकरी गाड्यांना बॅटरी बसवल्यानंतर ही अशक्य गोष्ट शक्य वाटते आहे.

प्रदूषण कमी करण्यासाठी भारताचा एक राष्ट्रीय व्यापक कार्यक्रम हाती घेतलाय, त्यासाठी स्वयंचलित वाहन उद्योगांनी एकत्रित यावे, असे आवाहन यावेळी नितीन गडकरी यांनी केले होते. या वाहनांसाठी बॅटरी चार्जिंगची सुविधा असणे गरजेचे आहे, त्याचे महत्व लक्षात घेऊन सरकारने देशभरातल्या जवळपास ६९ हजार पेट्रोल पंपांवर किमान एक चार्जिंग सुविधा केंद्र उभे करण्यासाठी परिसंस्था तयार करण्याची योजना आखत आहे. ही योजना प्रत्यक्षात आली तर देशातला मोठ्या प्रमाणात इंधन खरेदीसाठी बाहेर जाणारा पैसा देशातच गुंतवता येईल त्यामुळं विकास साधनं ही सहज शक्य होईल.

दुचाकी वाहनांसाठी घेण्यात येणार निर्णय

इंधनाच्या मर्यादित साठ्यांची सातत्याने चिंता करण्यापेक्षा त्यातून मार्ग काढण्याचा भारत सरकारनं निर्णय घेतलाय. भारत वाहन निर्मितीचे जागतिक केंद्र बनविण्यासाठी आपल्या ऑटो उद्योगाला काही महत्वपूर्ण बदल करताना नवीन संकल्पनांचा विकास केला पाहिजे. यामध्ये वेगवेगळ्या डिझाईनचे मॉडेल तयार करून संशोधन आणि विकास यावर अधिक भर दिला पाहिजे. या क्षेत्राला असलेली मोठी बाजारपेठ, स्थिर सरकार, भक्कम कार्य आराखडा आणि उज्ज्वल, प्रतिभावंत युवा अभियंते यांच्या जोरावर आपण अव्वल बनू शकतो, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला होता. वास्तविक सध्याही भारतामध्ये सर्वाधिक दुचाकी वाहनांची निर्मिती होते, असेही त्यांनी सांगितलं होतं.

पण कोरोनामुळं हे थांबलं

२०२० हे वर्ष इलेक्ट्रिक कारचे होते, अशी परिस्थीती होती. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या ऑटो एक्स्पो मध्ये जवळपास सर्वच कंपन्यांनी आपली इलेक्ट्रिक कारला लाँच केले किंवा कॉन्सेप्ट कार समोर आणली आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी त्या कारसंबंधी माहिती देत आहोत. ज्या कारला भारतात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जर तुम्हाला नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे.

सरकारनं घेतलाय मोठ्या गुंतवणूकीचा निर्णय

भारतातील स्वयंचलित वाहन क्षेत्रामध्ये असलेल्या अमर्याद संभावना लक्षात घेऊन सरकारने या क्षेत्रामध्ये उत्पादनाशी निगडीत प्रोत्साहन (पीएलआय) देण्यासाठी ५१००० कोटींची तरतूद केली आहे. अशा १० क्षेत्रांपैकी ही सर्वाधिक तरतूद वाहन उद्योगासाठी केली आहे, असे सांगून गडकरी म्हणाले, स्वयंचलित वाहन निर्मिती क्षेत्राला जवळपास २५ दशलक्ष कुशल कामगारांची आवश्यकता नजीकच्या काळात असणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रोजगार निर्मिती आणि वृद्धी या क्षेत्रामध्ये होणार असल्याचं बोललं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button