जम्मू काश्मीरसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, सरकारी नोकऱ्या राज्यातील नागरिकांसाठी आरक्षित घोषित

जम्मू काश्मीर :- कलम 370 हे कलम रद्द करून जम्मू काश्मिर या राज्याचा विशेष दर्जा काढण्यात आल्यानंतर आता हे राज्य केंद्र सरकारच्या अखत्यारित आहे. त्यामुळे इतर राज्यांच्या बरोबर जम्मू काश्मिरच्या विकासाची जबाबदारी केंद्रसरकारने घेतली आहे. जम्मू काश्मीर मधील तरूणांसाठी केंद्र सराकरने मोठी घोषणा केली आहे. जम्मू काश्मीर राज्यातील सरकारी नोकऱ्या राज्यातील नागरिकांसाठी आरक्षित घोषित केल्या आहेत. हे वृत्त इंडियन एक्सप्रेसच्या विजेता सिंघ यांनी ट्विट करून दिले आहे.

कलम ३७० रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने जम्मू – काश्मीर राज्यातील सरकारी नोकऱ्या राज्यातील नागरिकांसाठी आरक्षित घोषित केल्या आहेत. केंद्र सरकारच्या या महत्त्वपुर्ण निर्णयाचा तेथील तरूणांच्या रोजगाराचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे. जम्मू व काश्मीरच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारे- जम्मू व काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील ३७० कलम 2019 च्या ऑगस्ट महिन्यात रद्द करण्यात आल्यानंतर हे राज्य थेट केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली आले आहे.

Check pdf online