काँग्रेसचे मोठे नेते राज्यातील निर्णयांमध्ये सहभागी होत नाहीत- संजय राऊत

Sanjay Raut

मुंबई : काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक विधान करून खळबळ उडवून दिली होती. महाराष्ट्रातील आघाडी सरकारला केवळ पाठिंबा आहे. महाराष्ट्राच्या कुठल्याही मोठ्या निर्णयात काँग्रेसचा सहभाग नसतो, सरकार चालवणे आणि पाठिंबा देणे यात फरक आहे. असे म्हणून त्यांनी सरकारच्या स्थिरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांच्या या विधानावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचं विधान खरं आहे. काँग्रेसचे मोठे नेते राज्यातील निर्णयांमध्ये सहभागी होत नाहीत, अशी माहिती राऊत यांनी दिली आहे.

राऊत यांनी ‘आज तक’ या वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ३० वर्षांपासून शिवसेना-भाजपाची अतूट युती होती. शिवसेनेमुळे युती तुटली, हा भाजपाकडून होत असलेला आरोप अत्यंत चुकीचा आहे. टाळी कधीही एका हातानं वाजत नाही. भाजपाच्या वाईट काळात शिवसेना त्यांच्यासोबत राहिली. त्यांना साथ दिली; पण भाजपाला सत्तेची लालच आहे. सत्तेसाठी ते आपल्या मित्र पक्षाचं बलिदान देऊ पाहात होते.

त्यामुळे आज शिवसेना भाजपासोबत नाही. ” असं राऊत म्हणाले. यावेळी राऊत यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि राजकीय विषयावर भाष्य केलं. “तिन्ही पक्षांची विचारधारा वेगवेगळी आहे. मात्र, कोरोनाच्या लढाईत तिन्ही पक्ष एकजुटीनं काम करत आहेत. त्यामुळे विरोधकांची डोकेदुखी वाढली आहे. तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नसल्याचा आरोप चुकीचा आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती कशी आहे, हे फडणवीसांनाही माहिती आहे. विरोधी पक्षात असल्यानं ते आरोप करत आहेत; पण मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या शहरांची स्थिती सगळ्यांनाच माहिती आहे. राजकारण विसरून सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावं लागेल. ” असं राऊत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER