मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात मोठा जल्लोष

CM Fadnavis

नागपूर : राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी देणारी आणि आश्चर्यचकित करणारी घटना – देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

आज राजभवनात हा शपथविधी पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली.

देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

या सर्व घडामोडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदार संघासह संपूर्ण शहरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. फडणवीस यांच्या मतदार संघातील लक्ष्मीनगर भागात नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्या नेतृत्वात मोठा जल्लोष करण्यात आला. तत्पूर्वी त्यांनी वर्धा मार्गावर असलेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.