‘छत्रपती शिवाजी महाराज’ शब्द नसून मंत्र : ‘बिग बी’

Chhatrapati Shivaji Maharaj - Amitabh Bachchan

मुंबई : महानायक अमिताभ बच्चनने महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक यांना ३९०व्या जयंतीनिमित्त अनोखे अभिवादन केले आहे. आज बुधवारी ‘बिग बी’ने ट्विट करीत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.

‘छत्रपती शिवाजी महाराज’ केवळ शब्द नसून मंत्र आहे! कित्येक शतकांनंतरही त्यांच्याकडून प्रेरणाच मिळते. ते जगातील श्रेष्ठ योद्धा आणि आदर्श राजा होते. त्यांचे स्मरण करणे नेहमीच प्रेरणादायी असते. शिवजयंतीनिमित्त महाराजांना शत् शत् नमन, अशा भावना बॉलिवूडच्या या शहेनशहाने आपल्या ट्विटमध्ये व्यक्त केल्या आहेत. ‘बिग बी’च्या या ट्विटनंतर हजारो नेटकऱ्यांनी हे ट्विट शेअर करायला सुरुवात केली आहे.