रामदेवबाबांना मोठा धक्का, नेपाळमध्ये कोरोनिल किटवर बंदी

Ramdevbaba - Maharashtra Today

काठमांडू : योगगुरू रामदेव बाबा यांनी करोनावर प्रभावी असल्याचा दावा करत काही दिवसांपूर्वी कोरोनिल कीट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केली आहे. मात्र बाबा रामदेव यांना नेपाळ सरकारने झटका दिला आहे. रामदेव बाबा यांनी हे किट आपल्या शेजारील नेपाळला भेट म्हणून पाठवल्या आहेत. परंतु कोरोनिल औषध करोना विषाणूच्या संसर्गाविरोधात प्रभावी असल्याचा एकही ठोस पुरावा नसल्याचे म्हणत नेपाळ सरकारने याच्या वितरणावर बंदी घातली आहे.

स्थानिक वृत्तानुसार, पाळच्या डिपार्टमेंट ऑफ आय़ुर्वेद अँड अल्टरनेटीव्ह मेडीसिनच्या आदेशात म्हटलं की, कोरोनिलचे १५०० किट खरेदी करण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेचं पालन करण्यात आलेलं नाही. त्यामुळे कोरोनिलच्या वितरणाचे काम तत्काळ रोखण्यात येत आहे. याआधी बाबा रामदेव यांनी भारतात कोरोनिल औषधामुळे करोना बरा झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर देशात वाद निर्माण झाला. त्यानंतर रामदेव यांनी हे औषध रोगप्रतिकार शक्ती वाढवत असल्याचे म्हटले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button