पवारांकडून विखे पाटलांना मोठा धक्का; कट्टर समर्थक लवकरच राष्ट्रवादीत

Sharad Pawar - Radhakrishna Vikhe Patil - Maharashtra Today

अहमदनगर : जळगाव (Jalgaon) आणि सांगली (Sangli) महापालिकेमध्ये महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi) दिलेल्या धक्क्यानंतर आता माजी मंत्री आणि भाजपचे (BJP) आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना मोठा धक्का बसणार आहे. विखे पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब हराळे (Balasaheb Harale) हे राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करणार आहेत. बाळासाहेब हराळ हे विखे पाटील यांचे खंदे समर्थक असून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत.

मनसुख हिरेन (Mansukh Hiren), सचिन वाझे (Sachin Vaze) आणि आता परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी केलेल्या आरोपांमुळे मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारची कोंडी होत आहे. मात्र, असे असले तरी राज्यात पक्षीय पातळीवर मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसून येत आहेत. सांगली आणि जळगाव महापालिकेतील भाजपची सत्ता आपल्याकडे खेचून आघाडीच्या घटक पक्षांचा आत्मविश्वास अधिकच वाढला आहे. भाजपचे अनेक नेते, कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये (NCP) प्रवेश करताना दिसून येत आहेत. माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब हराळ हेसुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थिती हराळ यांचा पक्षप्रवेश होणार आहे.

त्यासाठी हराळ यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बैठक झाली. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या उपस्थित ही बैठक पार पडली. हराळ यांचा पक्षप्रवेश निश्चित असून यांच्या पत्नी काँग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्य आहे. दरम्यान, बाळासाहेब हराळ यांचा राष्ट्रावादी प्रवेश निश्चित झाल्यानंतर तनपुरे यांनी प्रतिक्रिया दिली. अनेक जण राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे मी या आधीच सांगितले होते. हराळ यांच्या प्रवेशानंतर नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचं प्रस्थ वाढणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER