‘बिग बी’ आणि ‘किंग खान’ पुन्हा येणार एकत्र

BigB-King Khan

मुंबई :- बॉलिवूडचे दोन सुपरस्टार ‘बिग बी’ अमिताभ बच्चन व किंग खान शाहरूख खान सुजॉय घोष दिग्दर्शित एका थ्रिलर सिनेमात पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. ‘मोहबते’, ‘कभी ख़ुशी कभी गम’ आणि भूतनाथ या चित्रपटाच्या भरघोस यशानंतर ही जोडी दिसेनासी झाली होती. मात्र दिग्दर्शक सुजॉय घोष यांनी दोघांना एकत्र आणले आहे. एका थ्रिलर सिनेमात ‘बिग बी’ आणि ‘किंग खान’ हे दोघे सोबत काम करणार आहेत.

शाहरूख खान झिरो चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे. यापूर्वी अमिताभ बच्चन व शाहरूख खान यांनी एकत्र बऱ्याच सिनेमात काम केले आहे. करण जोहरचा चित्रपट कभी खुशी कभी गममध्ये अमिताभ व शाहरूख बापलेकाच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसेच २००८ साली प्रदर्शित झालेल्या भूतनाथमध्ये ते दोघे एकत्र झळकले होते.

हा सिनेमा मर्डर मिस्ट्रीवर आधारीत आहे. या चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नू महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. यात अमिताभ बच्चन पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून ते या चित्रपटात मर्डर केस सोडवताना दिसणार आहेत. तापसी पन्नू व्यावसायिक महिलेच्या भूमिकेत पाहायला मिळेल. सुरुवातीला शाहरूख खान चित्रपटात केमिओ करताना दिसणार होता. मात्र शाहरूख या चित्रपटात गेस्ट अपियरन्स करणार नसून मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात शाहरूख तापसी पन्नूच्या पतीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तापसी पन्नू व शाहरुख हे दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. हा चित्रपट स्पॅनिश सिनेमा ‘कंट्राटैम्पो’चे अधिकृत हिंदी व्हर्जन असणार आहे. ‘बिग बी’ आणि ‘किंग खान’ हे दोघे पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार म्हटल्यावर त्यांचे चाहते खूप खूश झाले आहेत.