
सातारा : पुणे पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अभिजीत बिचकुले (Abhijeet Bichkule) यांनी पदवीधर मतदार यादीत नाव नोंदणीच केली नाही. त्यामुळे त्यांचा, माझे नाव मतदार यादीत नोंदले नाही, हा आरोप निराधार आहे, असा खुलासा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केला आहे.
आज (१ डिसेंबर) रोजी सकाळी बिचकुले साताऱ्यातील छत्रपती शिवाजी कॉलेज मतदान केंद्रावर मतदानासाठी गेले होते. मतदार यादीत त्यांच्या पत्नी अलंकृता बिचुकले यांचे नाव होते. मात्र त्यांच्या नावाखाली अभिजीत बिचुकलेंचे नाव नसून नारायण बिचुकले असे दुसऱ्याच व्यक्तीचे नाव होते. मतदार यादीत नाव नसल्याचे लक्षात आल्यानंतर अभिजीत बिचुकले यांनी वेळ बूथवर गोंधळ घातला. याचे खापर यंत्रणेवर व भाजपावर फोडले.
‘मामा, माझे या यादीत नाव नाही. उमेदवाराचं नाव नाही तर सर्वसामान्यांचे काय? कोणीही येऊन XYZ तिथे येऊन मतदान करेल. मी कधीही जातीवर राजकारण केले नाही. यांनी स्वत:ची नाव लिहिली. माझी नोंदणी झाली आहे. बायकोचे नाव आहे. पण माझे नाही! मी उमेदवार आहे. मला निवडणुकीपासून वंचित राहावे लागणार आहे. हा निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार आहे,’ अशी प्रतिक्रिया अभिजीत बिचुकले यांनी दिली.
निवडणूक आयोग अशाप्रकारे भोंगळ कारभार करत असेल, तर अवघड आहे. यंत्रणा या याद्या पुरवत होते, किंवा कोणत्या पक्षाच्या कोणत्या नेत्याच्या याद्या करत होते, निवडणूक आयोग कसा फॉलोअप घेत होता हे मला माहिती नाही. पण यात काहीतरी षडयंत्र आहे. मतदार यादीत उमेदवाराचे नाव नसण हा भोंगळ कारभार नाही का? कोणता पक्ष आहे, हे यात शोधले पाहिजे. भाजपाने या याद्या बनवल्या आहेत,’ असा आरोप बिचुकले यांनी केला होता.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बिचकुले यांच्या तक्रारीची दखल घेतली. मतदार नोंदणी अर्जाची छाननी केली. बिचकुलेंचा अर्ज नव्हता. यानंतर शेखर सिंह यांनी पत्रक प्रसिद्ध करून बिधाकुले यांचे आरोप निराधार असल्याचे सांगितले. पत्रकात म्हटले आहे – अभिजित बिचुकले यांनी मतदार यादीत नाव नोंदणीसाठी अर्ज केल्याचा कोणताही पुरावा नाही. बिचुकले यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला