IPL 2020: भुवनेश्वर आणि अमित मिश्रा आईपीएलच्या १३ व्या सत्रा मधून बाहेर, दिल्ली-एसआरएचला बसला धक्का

Bhuvneshwar Kumar- Amit Mishra

यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या १३ व्या सत्रा मधून दोन मोठ्या बातम्या येत आहेत. हे दोन्ही अहवाल दिल्ली कॅपिटल आणि सनरायझर्स हैदराबादच्या चाहत्यांना धक्का देण्यासाठी काही कमी नाहीत कारण दिल्लीचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा (Amit Mishra) आणि हैदराबादचा दिग्गज वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) संपूर्ण हंगामातुन बाहेर झाले आहे. ३७ वर्षीय अमित मिश्रा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज होता तर स्विंगचा जादूगार भुवनेश्वर हा एसआरएचच्या गोलंदाजीचा प्रमुख होता.

भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) हिप मध्ये जखम

गेल्या शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध १९ व्या षटकात भुवीला दुखापत झाली होती. सामन्यादरम्यान त्याची फिजिओद्वारे तपासणीही करण्यात आली होती, परंतु त्यानंतर त्याला मैदान सोडण्यास भाग पडले, त्याच्या अनुपस्थितीत खलील अहमदने षटक पूर्ण केले. भुवी या हंगामात रंगात दिसला. ०/२५, ०/२९, २/२५ आणि १/२० ची आकडेवारी त्याच्या मजबूत स्वरूपाचे सूचक आहे. भुवी गेल्या काही वर्षांपासून दुखापतग्रस्त होता, गेल्या वर्षी वेस्ट इंडीजविरुद्ध खेळात हर्नियाचा उपचार घेतला होता. आयपीएल २०१८ दरम्यान देखील तो दुखापतग्रस्त झाला होता, तर हैदराबादचा वेगवान गोलंदाज अष्टपैलू मिशेल मार्शला संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला, त्याच्या जागी जेसन होल्डरच्या संघात सामील करण्यात आले आहे. त्याने अजून पर्यंत एकही सामना खेळला नाही.

अमित मिश्राच्या (Amit Mishra) बोटाला दुखापत झाली

३७ वर्षीय अमित मिश्राने शनिवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध मोसमातील पहिला सामना खेळला. शारजाह येथे झालेल्या या सामन्यात दिल्लीच्या विजयात लेगस्पिनर महत्त्वपूर्ण ठरला. तो रंगात दिसत होता, या सामन्यात दुखापत झाल्यानंतरच रविवारी त्याचे स्कँनिंग करण्यात आले. आता संघ व्यवस्थापन अमित मिश्राच्या रिप्लेसमेंटचा विचार करीत आहे. युएईच्या धीम्या खेळपट्ट्यांवरील त्याचा अनुभव खूप प्रभावी ठरला असता, परंतु नितीश राणाचा झेल पकडताना त्याच्या बोटाला दुखापत झाली, त्यापूर्वी रविचंद्रन अश्विनसुद्धा मोसमातील पहिल्या सामन्यात फक्त एक षटक फेकल्यानंतर जखमी झाला होता. केकेआरविरुद्धच्या सामन्यात त्याने पुनरागमन केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER