‘होळकरांच्या संपत्तीवर पवारांचा डोळा’, अहिल्यादेवींचे वंशज भूषणसिंह होळकरांचा आरोप

सांगली :- जेजुरी (Jejuri) गडावरील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. आज शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार असून, पुतळ्याचे अनावरण करण्याला अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) यांच्या वंशजांनी विरोध केला आहे. ल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

होळकरांच्या संपत्तीवर पवार कुटुंबियांचा डोळा असल्याचा आरोप पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह होळकर यांनी केला आहे. आपण जर माहिती घेतली तर जेजुरी परिसरात हे लोकं प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे होळकरांच्या संपत्तीवर डोळा ठेवून आहेत, हे दिसेल. त्यासाठी हा उद्योग सुरु आहे, असा गंभीर आरोप भूषणसिंह होळकर यांनी केला आहे. केवळ संभाजीराजे छत्रपती यांनी जेजुरी गडावरील अहिल्यादेवी पुतळ्याचे अनावरण करावं. संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते जर अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण झले तर आम्ही त्याचे स्वागतच करू, असे होळकर यांचे वंशज भूषणसिंह होळकर (Bhushan Singh Holkar) यांनी म्हटलं आहे. यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून भूषणसिंह होळकर यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली.

जेजुरी येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचा आडून बहुजन समाजात द्वेष पसरवण्याचे राजकारण सुरू असून आज पार पडणाऱ्या उद्घाटन सोहळ्याला छत्रपती संभाजीराजे यांनी जाऊ नये, अशी पत्राद्वारे विनंती केली असल्याचे भूषण सिंह होळकर यांनी सांगलीमध्ये बोलताना सांगितला आहे. तसेच या पुतळ्याचे अनावरण बहुजन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांच्या हस्ते होऊ नये, या गोष्टीला आमचा विरोध असून छत्रपती संभाजी महाराज जर त्या कार्यक्रमाला जाणार असतील तर त्यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणे योग्य ठरेल, त्याला आमचा विरोध असणार नाही, पण होळकर घराण्याच्या संस्कृतीचा आणि 70 वर्षांपासून बहुजन समाजाचा राजकारणासाठी वापर केलेल्या व्यक्तीकडून अनावरण झाल्यास देशभरातील बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या जातील, असेही भूषणसिंह होळकर यांनी स्पष्ट केले आहे.

ही बातमी पण वाचा : पुतळा अनावरणाचा वाद पेटला पवारांसोबत जावू नका : होळकर कुटुंबाचे संभाजी राजेंना पत्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER