भूमिपुत्राला मुख्यमंत्री करणार : नरेंद्र मोदी

PM_Narendra_Modi

पश्चिम बंगाल :- सध्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभा सुरू आहे. प्रचारासाठी बंगालमध्ये असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. ‘वंदे मातरम’च्या माध्यमातून येथील भूमीने देशाला एकत्र आणले; पण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी लोकांना बाहेरचे, असे संबोधित केल्याचे मोदींनी म्हटले. दरम्यान मोदींनी यावेळी भाजपा सत्तेत आल्यास येथील भूमिपुत्रालाच मुख्यमंत्री करणार, असे आश्वासन दिले आहे.

रवींद्रनाथ टागोर, सुभाषचंद्र बोस, बंकिमचंद्र चॅटर्जी अशा महान लोकांची बंगाल ही भूमी होती आणि येथे कोणताही भारतीय बाहेरचा नव्हता. “ ‘वंदे मातरम’च्या माध्यमातून बंगालने जनतेला एकत्र आणले. पण ममतादीदी ‘बाहेरील लोक’ असा उल्लेख करतात. येथे कोणताही भारतीय बाहरेचा नव्हता, सर्व भारतमातेची मुले आहेत.” असे नरेंद्र मोदींनी म्हटले.

आम्हाला पर्यटक म्हणून म्हटले जाते, आमची खिल्ली उडवली जाते, त्याचबरोबर अपमानदेखील केला जात आहे. यावेळी मोदींनी जेव्हा बंगालमध्ये भाजपाचे सरकार स्थापन होईल, तेव्हा येथील स्थानिक व्यक्तीच मुख्यमंत्री असेल, असे आश्वासन दिले. मोदींचे हे वक्तव्य ममता बॅनर्जींसोबत आतले आणि बाहेरचे असा वाद आहे. ममता बॅनर्जी सतत बंगालमध्ये, दिल्ली किंवा गुजरातमधून आलेल्या बाहेरच्या लोकांना राज्य करू देणार नाही, असे सांगतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER