… तर म्हणाल अजित पवार काय भंगार बोलत होता तोंड वर करून !

अहमदनगर :- उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज नगर जिल्ह्यातील राहुरी इथल्या कार्यक्रमात आपल्या स्टाईलमध्ये भाष्य केले. राहुरी तालुक्यातील वांबोरी ‌येथे मुख्यमंत्री सौर उर्जा योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पाचं (Solar energy project) भूमिपूजन अजित पवारांनी केलं. यावेळी ऊर्जा विषयावर बोलताना एकच हशा पिकवला. “सौर ऊर्जा प्रकल्प सूर्यप्रकाशावर चालणार आहे. सूर्य उगवला, बटण चालू केलं की मोटर सुरू. सूर्य मावळला की मोटर बंद. ढगाळ वातावरण आलं की मोटर बंद.

कारण उन्हच नाही आलं तर ते कसं काय चार्ज होणार? मी आधीच सांगतोय, उद्याच्याला ढगाळ वातावरण आलं, पावसाळ्यात वगैरे नाही तापलं तर म्हणाल अजित पवार काय भंगार बोलत होता तोंड वर करून… तर ते सूर्य असेल तरच चालणार हे लक्षात ठेवा. त्या प्लेटवर सावली आली तरी सौर प्रकल्प चालणार नाही.

तिथं झाडंबिडं लावायला जाऊ नका.” अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे एकच हशा पिकला. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प आम्ही राबवतोय. गेल्या पाच वर्षांत  शेती पंपाची ४५ हजार कोटी थकबाकी झाली आहे. त्यामुळे राज्य सरकार विजेच्या बाबतीत काम कसं करणार? असा सवाल उपस्थित करत आपणही आपली वीज बिलं न भरण्याची मानसिकता बदलायला हवी. आम्ही थकबाकीत ५० टक्के सवलत देणार असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले.

ही बातमी पण वाचा : ‘हे बघा हे पठ्ठे, येथे बिनमास्कचे फिरत आहेत, आता काय त्यांच्यापुढे डोके फोडून घ्यावं?, अजित पवार संतापले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER