ओबीसी आरक्षणासाठी अखेर भुजबळांनी मागितली फडणवीसांची मदत

Devendra Fadnavis-Chhagan Bhujbal

मुंबई :- सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण (OBC Reservation) रद्द केल्यानंतर ओबीसींमध्ये राज्य सरकारविरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे. अनेक ओबीसी संघटना तसेच भाजपनेही (BJP) जनआंदोलनाचा इशारा दिला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही आरक्षणासाठी जनआंदोलन उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ओबीसी आरक्षणासाठी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना फोन करुन मदत मागितली आहे.

ओबीसी आरक्षण रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर समता परिषदेची सोमवारी बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी चर्चा केली. ओबीसी आरक्षणासाठी सरकारमधील राजकीय पक्षांसह विरोधी पक्षांचीही बैठक घेणार आहो. सगळ्या संघटनाना सोबत घेऊन लढू. तसेच रविवारी देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलणे झाले आहे. त्यांना केंद्राकडून मदत मागण्याची विनंती करण्यात आल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

भुजबळ म्हणाले, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न केवळ पाच जिल्ह्यांपुरता नाही. संपूर्ण देशात हा निर्णय लागू झाला आहे. शिक्षण आणि नोकरीमध्ये 27 टक्के आरक्षण लागू आहे. राजकीय आरक्षणाला धक्का लागला आहे. राज्यातील ओबीसींच्या सुमारे 65 हजार जागा कमी झाल्या आहेत. मुख्यमंत्री पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. बैठकीत या विषयावर ते चर्चा करतील. भाजपचे सरकार असताना त्यांच्याकडे आरक्षणाबाबतचा डाटा नव्हता. आता आम्ही डाटा मिळण्याची मागणी केली आहे.

सर्व बाजूने कोंडी झाल्या मुळे अडचण निर्माण झाली आहे. आरक्षणासाठी विरोधकांनी आंदोलन केलं तरी चांगलंच आहे. त्यामुळे या मागणीला बळ मिळणार आहे. समता परिषदही जनआंदोलन करणार आहे. पंतप्रधानांच्या भेटीनंतर निर्णय घेतला जाईल. आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत केंद्र सरकारने लक्ष घालायला हवं. सध्या जुन्या पद्धतीने २७ टक्के आरक्षण देऊन निवडणुका घ्यावात, अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button