शिवसैनिकांपासून वाचण्यासाठी भुजबळांना चादर घेऊन झोपावं लागलं होतं!

Maharashtra Today

२०१९ची विधानसभा अनेक अर्थान महत्त्वाची होती. ईडीच्या धाडी आणि भाजपात प्रवेशासाठी रांग लावणारे कॉंग्रेस, राष्ट्रवादी नेते रांगा लावून होते. भ्रष्टाचाराच्या आरोपात तुरुंगवास भोगून आलेले भुजबळ नाराज आहेत आणि ते पुन्हा राष्ट्रवादीच घड्याळ उतरवून हाती शिवबंधन बांधतील अशा बातम्यांचं पेव फुटलं. तेव्हा भुजबळांना शिवसेनेत प्रवेश देण्यावरुन दोन गट पडले होते. यामुळं पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)संभ्रमात होते. शेवटी भूजबळांनी सेनेत जाणं टाळलं. भुजबळ राष्ट्रवादीतून सेनेत जाणार या चर्चेनं जितकं वातावरण तापलं होतं त्याहून जास्त वातावरण तापलं होतं भूजबळांनी बाळासाहेब ठाकरेंची (Balasaheb Thackeray)साथ सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर. छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal)शिवसेना का सोडली याचं कारण अनेकांना आजही माहिती नाही.

राजकीय कारकिर्दीला सुरुवात

छगन भुजबळांनी शिवसेना बाळसं धरत असताना सुरुवातीच्या काळात धडाकेबाज कामगिरी शाखाप्रमुख म्हणून करुन दाखवली. बाळासाहेबांचा हात त्यांच्या डोक्यावर पडला आणि ८५ च्या विधानसभा निवडणकीत विजयी होऊन त्यांनी विधानसभा गाठली. शिवसेनेत असल्यामुळं त्यांच्या स्वभाव आक्रमक होता आणि भाषणाची शैलीसुद्धा. सताधाऱ्यांवर तुटुन पडायची त्यांची शैली सभागृहाला नवीन होती. त्यामुळं त्यांना वारंवार सभागृहात न बोलण्याची शिक्षा व्हायची. भुजबळांच्या टीका आणि टिप्पन्यानंतर मराठी, हिंदी, इंग्रजी वर्तमानपत्रांचे मथळे गाजवू लागले.

ताटातूट

भुजबळांनी शिवसेनेत (Shivsena) आपला प्रभाव निर्माण केला. निष्ठावंत शिवसैनिकांची फौज त्यांनी सांभाळली. १९९० मध्ये जवळच्या लोकांना तिकीट मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. बाळासाहेबांचा विश्वास जिंकण्यात भुजबळ यशस्वी ठरल्यामुळं बाळासाहेबांनी यात हस्ताक्षेप केला नाही. भुजबळ मुंबईच्या शिवसेनेला महाराष्ट्रभर घेऊन जात होते. मराठवाड्या शिवसेनेला चांगलं यश मिळेल अशा बातमी धडकली सोबत आणि एक खबर घेऊन. भुजबळांचा वाढता प्रभाव शिवसेनेला घातक ठरु शकतो. त्यांचे पंख वेळेत छाटायला हवेत अशी कुजबुज मातोश्रीवर सुरु झाली.

भुजबळांनी ९० विधानसभा निवडणूकीत शिवसेनेचे अधिकाधिक उमेदवार निवडूण यावेत यासाठी जीवाचं रान केलं. तसं यशही पदरात पडलं. विधानसभेचं विरोधीपक्ष नेते पद शिवसेनेला मिळालं. सर्वांनाच माहिती होतं विरोधीपक्षनेते भुजबळ होतील पण सर्वांचा अंदाज फोल ठरवत बाळासाहेबांनी ती जबाबदारी मनोहर जोशींवर टाकली. भुजबळांना हा पहिला मोठा धक्का होता. भुजबळ दुखावले गेले.

ओबीसी असल्यामुळं भुजबळांवर अन्याय झाला?

पंतांना विरोधीपक्ष नेतेपद मिळाल्यामुळं नाराज झालेल्या भुजबळांनी त्यांची खंत बोलून दाखवायला सुरुवात केली. ओबीसी असल्यामुळं आपल्यावर अन्याय झाल्याचं त्यांनी अनेकदा सांगितलं. शिवसेने विरुद्ध त्यांनी बंड पुकारलं. मंडल आयोगाचं वारं त्या काळात वाहू लागल्यामुळं भुजबळांच्या आरोपाच्या ठिणगीनं वणव्याचं रुप घेतलं. बाळासाहेब यामुळं प्रचंड चिडले. शिवसेनेची प्रतिमा जात-पात विरहीत पक्ष अशी होती. भुजबळांच्या या आरोपांमुळं शिवसेनेच्या प्रतिमेला तडा जात होता. बाळासाहेब आणि भुजबळ यांच्या नात्यात दरी निर्माण होऊ लागली.

एका आर्ट गॅलरीच्या उद्घाटनाला दोघे तिथं उपस्थीत होते. तेव्हा कॉंग्रेसच्या रामराव अदिक यांना बाळासाहेब भुजबळांना उद्देशून म्हणाले, “आमच्याकडचा कचरा तुम्ही घेऊन जा.” ही गोष्ट भुजबळांच्या मनाला लागली. शिवसेनेवर नजर ठेऊन असणाऱ्या पवारांनी भुजबळांची ही तडफड ओळखली आणि कॉंग्रेसमध्ये भुजबळांना आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. ९१ च्या नागपूर अधिवेशना दरम्यान भुजबळांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट केला.

जिवाशी आलेलं प्रकरण चादरीनं निभावलं

यानंतर शिवसैनिक चिडले. बाळासाहेबांनी ‘लखोबा लोखंडी’ म्हणत भुजबळांना धारेवर धरलं. शिवसैनिक भुजबळांच्या मागावर होते. एकदा ते पद्मसिंह पाटलांच्या बंगल्यावर होते. ते तिथं असल्याची खबर लागल्यानं शिवसैनिकांनी बंगल्याला घेराव घातला. भुजबळांनी प्रसंगावधानता दाखवली आणि एका रस्त्याच्या कडेला बाकावर चादर ओढून पडून राहिले. मोठ्या संकटातून ते वाचले.

येवल्याला परतले

वातावरण शांत झालं. भुजबळांनी कॉंग्रेसमध्ये रुळले. बाळासाहेबांना त्यांनी पत्र पाठवलं. वातावरण निवळलं. ८५ आणि ९० ची विधानसभा भुजबळ मुंबईच्या माझगावमधून निवडूण आले होते. शिवसेनेच्या ताब्यातल्या मुंबईत भुजबळ पुन्हा निवडूण येणं शक्य नव्हतं. पवारांनी त्यांची राजकीय पावर वापरत भुजबळांना नाशिकच्या येवल्यातून निवडणूक लढवायला सांगितलं. नंतर भुजबळ येवलात रमले. पवारांनी पडत्या काळात खंबीर साथ दिल्याबद्दल ते कायम त्यांचे ऋणी असल्याचं सांगतात. भुजबळांनी एकेकाळी शिवसेने विरुद्ध ओबीसी हत्यार उचललं पण नंतर राष्ट्रवादीची स्थापना झाली. ओबीसी जागरणाचे त्यांनी वरकरणी प्रयत्न केले पण वैयक्तीक राजकारणाच्या दगदगीत ओबीसी राजकारणाचा बळी गेला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button