‘पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने’चे भुजबळांकडून कौतुक; भाजप नेत्यांची टोलेबाजी

Chhagan Bhujbal

मुंबई : राज्यातील कोरोनाचा (Corona virus) विळखा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी १५ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. यात संचारबंदीसह अनेक कडक निर्बंध लावले आहेत. अशा वेळी हातावर पोट असणाऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी आर्थिक पॅकेजही देण्याची घोषणा केली. दुसरीकडे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना लिहिलेल्या पत्रावरूनही भाजप (BJP) नेत्यांनी राज्य सरकारवर टोलेबाजी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर एक महिना ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. भुजबळ यांनी पंतप्रधान मोदींना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात गेल्या वर्षी ‘पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना’ महाराष्ट्रात यशस्वी ठरल्याचे भुजबळांनी म्हटले आहे. तसेच कोरोनाची स्थिती लक्षात घेत मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे.

केशव उपाध्येंचा खोचक टोला
भुजबळांच्या पत्रावरून भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्य सरकार आणि मंत्र्यांवर टीका केली आहे. “केंद्र सरकार कोणताही दुजाभाव न ठेवता सर्व मदत करत आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर २०२० या ८ महिन्यांच्या काळात फेज १ आणि २ मधील ‘पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना’ महाराष्ट्रात मोठी यशस्वी ठरली.” असे उपाध्याय यांनी पत्रात नमूद केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button