भुईबावडा घाटमार्ग पुन्हा बंद : ३६ किलोमीटरचा वळसा

भुईबावडा घाटमार्ग

रत्नागिरी : कोरोना (Corona) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चार महिने भुईबावडा घाटमार्ग प्रशासनाने बंद केला होता. दरम्यान, गणेशोत्सव कालावधीत घाटमार्ग तीन आठवडे सुरू केला होता. मात्र, काल रविवारी दुपारी पोलिस प्रशासनाने वरिष्ठांचे आदेश असल्याचे सांगत भुईबावडा घाटमार्ग पूर्णतः बंद केला आहे.

भुईबावडा घाटमार्ग बंद करुन प्रशासन नेमके काय साध्य करणार आहे? असा संतप्त सवाल वाहनचालकांसह प्रवाशांमधून केला जात आहे. याआधी चार महिने घाटमार्ग बंद असूनही दिवसभरात मोटारसायकलची ये-जा सुरू होती. आता घाटमार्ग बंद करून ही वाहतूक सुरू रहाणार नाही का? असाही सवाल प्रवाशांमधून केला जात आहे. या परिसरातील आजारी रुग्णांला 36 कि. मी. चा वळसा मारून करुन घाटमार्गे पुढील उपचारासाठी कोल्हापूरला घेऊन जावे लागणार आहे याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल केला जात आहे. राज्यात सरसकट बंदी शिथिल होऊनही घाटमार्ग का बंद केला? घाटमार्ग बंद केल्यामुळे वाहनचालक व प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने भुईबावडा घाट लॉकडाऊन काळात तब्बल चार महिने बंद ठेवला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER