
मुंबई : काल्हेर ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवार शिवसेना (Shivsena) शाखाप्रमुख दीपक म्हात्रे (Deepak Mhatre) यांच्यावर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञाताकडून गोळीबार करण्यात आला . या गोळीबारात ते थोडक्यात बचावले. दीपक म्हात्रे हे पत्नीसह वैयक्तिक कामासाठी ठाणे इथे गेले होते. ठाण्यातून घरी आल्यानंतर त्यांनी घरासमोरील परिसरात गाडी पार्क केली. तेव्हाच अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला.
मात्र दीपक म्हात्रे यांनी प्रसंगावधान राखत गोळी चुकवली आणि पत्नीलाही सुरक्षित ठिकाणी नेले. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान, या घटनेनंतर नारपोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ग्रामपंचायत निवडणुकीत सुरू असलेल्या वादातून हा गोळीबार झाल्याचे बोलले जात आहे. मात्र पोलिसांच्या तपासानंतर सर्व प्रकार समोर येणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला