भिवंडी : काँग्रेसमध्ये पडझड, पदाधिकाऱ्यांसह २१ नगरसेवकांचा राजीनामा

Congress Flags

भिवंडी : काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह २१ नगरसेवकांनी राजीनामा दिल्याने भिवंडी शहरात काँग्रेसला मोठा धक्का बसला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने (Congress) भिवंडी (Bhiwandi) शहर जिल्हाध्यक्षपदावर सुमारे ९ वर्षांपासून कार्यरत शोएब खान गुड्डू यांची पदावरून उचलबांगडी करून प्रभारी अध्यक्ष म्हणून माजी आमदार रशीद ताहीर मोमीन यांची नियुक्ती केली. भिवंडी महानगरपालितील काँग्रेस नगरसेवकांसह पदाधिकारी यांचा या नियुक्तीला विरोध आहे. त्यांनी बंड पुकारून राजीनामा दिला.

भिवंडी महानगरपालिकेत सध्या काँग्रेसचे ४७ नगरसेवक असून त्यापैकी १८ ने डिसेंबर २०१९ ला महापौर निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराविरोधात मतदान करून बंडखोरी केली होती. त्यानंतर प्रदेश काँग्रेसने शोएब खान गुड्डू यांला पदावरून हटवले आहे.

शोएब खान गुड्डू यांची २०१२ मध्ये शहर काँग्रेस पदावर नियुक्ती केल्या पासून महानगरपालिका सभागृहात काँग्रेस पक्षाचे संख्याबळ वाढविण्यात महत्वाची भूमिका आहे. शहरात काँग्रेस मजबूत करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असून त्यांना पदावरून दूर करताना प्रभारी म्हणून केलेली नेमणूक चूक असल्याचा आरोप नगरसेविका फरजाना इस्माईल रंगरेज यांनी केला. काँग्रेस प्रभारी अध्यक्ष म्हणून माजी आमदार रशीद ताहीर मोमीन यांच्या नियुक्ती विरोधात बंड पुकारीत काँग्रेस नगरसेवक पदाचा राजीनामा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ,महानगरपालिका आयुक्त डॉ पंकज आशिया यांना पाठविला आहे.

रशीद ताहीर यांच्या नियुक्तीविरोधात काँग्रेस नगरसेवक पदाधिकारी यांच्या एका गटात प्रचंड रोष असून त्यांनी नेहमीच काँग्रेसविरोधात भूमिका घेत पक्षाच्या उमेदवारा विरोधात काम केले असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची शहरात वाढ न होता अधोगती होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

दीड वर्षानंतर महानगरपालिका निवडणुका असून त्यावेळी पक्षाला याची किंमत मोजावी लागेल. प्रदेश काँग्रेसने अध्यक्ष पदावरील रशीद ताहीर यांच्या नियुक्तीचा फेरविचार न केल्यास सर्व नगरसेवक काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देतील, असा इशारा नगरसेवक फराज बहाउद्दीन यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER