भिंवडीत तीन मजली इमारत कोसळली, १२ जणांचा मृत्यू

Building Collapsed Bhiwandi

ठाणे : भिंवडीमध्ये (Bhiwandi) सोमवारी पहाटे तीन तीन मजली इमारत कोसळली. या घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला असून २० जणांना बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या (NDRF) जवानांना यश आलं आहे. तर कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पहाटे सगळे गाढ झोपेत असतानाच इमारत जमीनदोस्त झाली, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Bhiwandi Building Collapse

भिंवडीतील पटेल कंपाऊंडमधील जिलानी अपार्टमेंट ही दुर्घटना घडली आहे. पहाटे तीन ते साडेतीन वाजताच्या सुमारास अचानक इमारत कोसळली. त्यानंतर सर्वत्र आरडाओरड आणि धावपळ सुरू झाली. इमारत दुर्घटनेनंतर तातडीनं ठाणे महानगर पालिकेच्या पथकासह एनडीआरएफच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मदत कार्य वेगानं सुरू करण्यात आलं. मात्र, परिसरातील सर्तक नागरिकांमुळे २० जणांना इमारतीच्या ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात आलं. सकाळी साडेसातपर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान एका लहान मुलाला ढिगाऱ्याखालून सुखरुप वाचविण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER