भीमा कोरेगाव : आनंद तेलतुंबडे, गौतम नवलाखा यांच्यासह आठ जणांविरुद्ध एफआयआर

FIR against Anand Teltumbde, Gautam Navlakha

पुणे : भीमा कोरेगाव प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने  (एनआयए)  आनंद तेलतुंबडे, गौतम नवलाखा, हॅनी बाबू, सागर गोरखे, रमेश गैचोर, ज्योती जगताप, स्टॅन स्वामी आणि मिलिंद तेलतुंबडे या आठ  जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. असे वृत्त एनआयएने दिले आहे.

भीमा कोरेगावमध्ये २०१८ मध्ये झालेल्या हिंसाचारप्रकरणी आजच राष्ट्रीय तपास यंत्रणेने स्टॅन स्वामी यांना झारखंडमध्ये अटक केली. त्यापाठोपाठ आठ जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. १ जानेवारी २०१८ रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगावमध्ये हिंसाचार उसळला होता. त्याआधी एक दिवस पुण्यातल्या शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनात या हिंसेचं मूळ आहे, असा पुणे पोलिसांचा आरोप आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER