भीमा कोरेगाव प्रकरण : एनआयएने फादर स्टॅन स्वामींना केली अटक

Stan Swamy

नवी दिल्ली : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी एनआयएने सामाजिक कार्यकर्ते फादर स्टेन स्वामी (Stan Swamy) यांना अटक केली आहे.

फादर स्टेन स्वामी यांना झारखंडमधून अटक करण्यात आली. नामकुम स्टेशन हद्दीत येणाऱ्या बगईंचा स्थित त्यांच्या निवासस्थानातून त्यांना ताब्यात घेतलं. जवळपास २० मिनिटे चौकशी केल्यानंतर स्वामी यांना अटक केली.

२०१८ साली महाराष्ट्राच्या कोरेगाव भीमामध्ये (Bhima-Koregaon Violence) येथे जातीय दंगल झाली होती. या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आरोपींच्या शोधात असताना एनआयएनं ८३ वर्षीय फादर स्टॅन स्वामी यांना अटक केली आहे.

आज (शुक्रवारी) स्वामी यांना एनआयए न्यायालयासमोर हजर केलं जाण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फादर स्टेन स्वामी यांना रिमांडवर घेतलं जाण्याची शक्यता आहे. किंवा ट्रान्झिट रिमांडवर त्यांना दिल्लीला आणलं जाईल अशी माहिती आहे.

स्वामींची या अगोदर २७-३० जुलै आणि ६ ऑगस्टलाही एनआयएकडून चौकशी करण्यात आली होती. चौकशीवेळी माओवाद्यांशी संबंध असल्याचे सर्व आरोप स्वामी यांनी फेटाळले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER