एनआयए तपास : किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारला टोला, ‘उद्धवा, अजब तुझे सरकार!’

CM Uddhav-Kirit Somaiya

मुंबई : शिवसेनेवर टीका करण्याची संधी भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या सहसा सोडत नाहीत. आज शुक्रवारी त्यांनी भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या तपासावरून ठाकरे सरकारवर ट्विट करीत निशाणा साधला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी आज शुक्रवारी आपली नाराजी व्यक्त केली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही काल गुरुवारी या निर्णयाबाबत तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली होती. या पृष्ठभूमीवर, किरीट सोमय्या यांनी आज ट्विट केले. ‘उद्धवा, अजब तुझे सरकार’ म्हणत एकूणच घटनाक्रम पुढे ठेवला.

तो पुढीलप्रमाणे :
२२ डिसेंबर : शरद पवार यांच्यातर्फे एसआयटी चौकशीची मागणी
२३ जानेवारी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तपासाबाबत महाराष्ट्र पोलिसांना आग्रह
२४ जानेवारी : शरद पवार यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र
२५ जानेवारी : ‘एनआयए’ने तपास हाती घेतला
२५ जानेवारी : महाराष्ट्र सरकारचा ‘एनआयए’ला विरोध
२७ जानेवारी : महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा ‘एनआयए’ला विरोध आणि महाराष्ट्र पोलिसच तपास सुरू ठेवतील, अशी घोषणा
७ फेब्रुवारी : प्रकरण न्यायालयात पोहचले
१३ फेब्रुवारी : प्रकरण ‘एनआयए’कडे सुपूर्द करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
‘उद्धवा, अजब तुझे सरकार!’