टाईम मासिकाच्या १०० नेक्स्टची यादीत भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद

Chandrashekhar Azad Ravan

नवी दिल्ली : टाईम मासिकाने (Time Magazine) २०२१ च्या १०० नेक्स्टची यादीत भीम आर्मीचे (Bhim Army) चंद्रशेखर आझाद (Chandrashekhar Azad) यांचा समावेश करण्यात आला आहे. टाईम मासिकाच्या वार्षिक १०० उगवत्या नेतृत्वाच्या यादीत आझाद यांच्यासह पाच भारतीय वंशाच्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ट्विटरच्या सर्वोच्च वकील विजया गाडे आणि ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सनक यांचाही समवावेश आहे.

टाईम मासिकाने २०२१ च्या १०० नेक्स्टची यादी काल बुधवारी प्रसिद्ध केली. टाईमच्या जगातील सर्वात प्रभावशाली १०० व्यक्तींच्या याद्यांमध्ये ही श्रेणी नव्याने समाविष्ट करण्यात आली आहे. या नव्या यादीत भविष्यात इतिहास घडवण्याची क्षमता असणाऱ्या जगभरातली उद्योन्मुख नेतृत्वांचा सामावेश करण्यात आला आहे. टाईम १०० चे एडिटोरियल डायरेक्टर डेन मॅक्स यांनी सांगितले की, ‘या यादीत समविष्ट सर्व व्यक्ती भविष्यात इतिहास घडवण्याची ताकद ठेवतात. काही तर आताच इतिहास घडवत आहेत.

टाईम मासिकाच्या १०० उद्योन्मूख जागतिक नेतृत्व यादीत समाविष्ट करण्यात आलेले ३४ वर्षाचे चंद्रशेखर आझाद हे दलितांना शिक्षणाच्या माध्यामातून गरीबीतून बाहेर येण्यासाठी शाळा चालवतात असे टाईम प्रोफाईलमध्ये नमुद करण्यात आले आहे. याचबरोबर दलितांवरील अन्यायाविरुद्ध बुलंद आवाज उठवण्यातही ते अग्रेसर असतात. ते चिथावणीखोर आंदोलने करतात. असेही त्यांच्या टाईम प्रोफाईलमध्ये म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER